Office Cleaning services in Pune

आपले घर अधिक प्रभावीपणे स्वच्छ कसे करावे

Kitchen Cleaning Services Pune

घर साफसफाई करणे मजेदार असू शकते! चला तर बघूया कसे.

 

घराची साफ सफाई ही काही अशी गोष्ट नाहीये कि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. किंबहुना आपण ते दुसऱ्या दिवसा साठी टाळतो. परंतु जेव्हा धूळ आणि जाळं जळमटे आपल्याला घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून दिसायला लागतात तेव्हा मात्र आपल्याला कळते कि आता कामाला लागले पाहिजे.

पण तुम्ही कुठून सुरुवात कराल? जाळं काढाल, फरशी साफ कराल की झाडू माराल? परंतु, घर स्वच्छ करणे जितके वाटते तितके कठीण नाही. फक्त आम्ही सांगतो तसे करा.

 

 1. अनावश्यक वस्तू काढा – वृत्तपत्रे, मासिके आणि रिकामे डिलिव्हरी बॉक्सेस हे घरात साचत जातात. ते फक्त जागा घेत नाहीत, तर ते झुरळं आणि धूळ लपण्यासाठी उत्तम ठिकाणे बनतात. म्हणून अश्या नको असलेल्या गोष्टी अगोदर घरातून बाहेर काढा.
 1. तुमची साफ सफाई ची उपकरणे आणि केमिकल्स बाहेर काढा – डीप क्लीनिंग साठी योग्य उपकरणे आवश्यक आहेत. ही सर्व उपकरणे आणि केमिकल्स एका बादलीत भरून घ्या. ऐन वेळी वस्तू शोधायचा त्रास होऊ नये म्हणून सर्व वस्तू एकत्रच ठेवा.
 1. धूळ काढण्या पासून सुरुवात करा – पंखे बंद करा आणि त्यांची संपूर्ण धूळ काढण्याने सुरुवात करा. कपाटांच्या वरच्या भागांपासून सुरुवात करून हळूहळू खाली या. बेड, सोफा आणि कपाटांच्या खालचा भाग साफ करायला विसरू नका. सॊफ्या ची संपूर्ण व्हॅक्युमिंग करा.
  धूळ काढून झाल्या नंतर व्हॅक्युमिंग सुरु करा, एका खोलीपासून दुसऱ्या खोलीकडे. जर तुमच्याकडे व्हॅक्युम क्लीनर नसेल तर सामान्य झाडू देखील ठीक आहे. तुम्ही चहाचा आनंद घेऊन थोडी विश्रांती घेऊ शकता पुढच्या गोष्टी कडे वळण्यापूर्वी.
 1. निर्जंतुकीकरण (Disinfection) – तुमच्या घरातील सर्व पृष्ठभाग जंतुनाशक द्रव्याने (Disinfectant) पुसून घ्या जेणेकरून कीटकांपासून सुरक्षित राहाल. हे खास करून किचन च्या ओट्या साठी अत्यंत गरजेचे आहे. टीव्ही चे रिमोट आणि फोन साफ करायला विसरू नका. घरगुती जंतुनाशक द्रव्य बनवण्या साठी एक कप पाण्यात एक चतुर्थांश व्हिनेगर (Vinegar) मिसळा.
  पुढे काचेच्या पृष्ठभागांवर काम करा. जंतुनाशक द्रव्य काचेवर फवारून स्वच्छ कपडयाने पुसून घ्या.
 1. शौचालय, नळ आणि बेसिन (Basin) – शौचालय साफ करण्याचे द्रावण (Toilet Cleaner) कमोड च्या कडेभोवती हळुवारपणे फिरवा. ते काही काळ तसेच ठेवा. आता स्नानगृहातील बाथटब आणि नळाकडे वळा आणि तुमच्या कडे असलेले केमिकल स्प्रे करा किंव्हा लावून ठेवा. तुम्ही लावलेले केमिकल सर्व ठिकाणी पोहोचल्याची खात्री करा. स्वयंपाकघरातील नळासोबतही तसेच करा.
  आता केमिकल लावलेली सर्व ठिकाणं कमोड, बाथटब, नळ आणि बेसिन स्वच्छ करण्यासाठी घासा जो पर्यंत ते चमकदार स्वच्छ होत नाही.
  किचन चिमणी आणि गॅस स्टोव्ह ची डीप क्लीनिंग करायची पण ही एक योग्य वेळ असू शकते.
 1. फरशी पुसणे – फरशी पुसायला घेतली म्हणजे तुमचे काम जवळ जवळ संपत आलंय. अर्ध्या बादली पाण्यात काही थेंब सफाई द्रावण (Floor Cleaner) टाका आणि सर्व खोल्यांची फरशी पुसा.
 1. आपली साधने स्वच्छ करा – आपण सफाई संपवल्यानंतर नियमितपणे आपली साधने स्वच्छ करावी. मॉप, झाडू आणि कपडे स्वच्छ करावेत. सर्व व्यवस्थित ठेऊन द्यावे जेणे करून ते आपल्याला पुढच्या वेळी लगेच सापडतील.

आपले कुटुंब या सफाई मध्ये सहभागी झाल्यास ही क्रिया अजून मजेदार होऊ शकते. किंवा आपण स्वतः निवांत बसून हे काम दुसऱ्याला करायला सांगू शकता. आणि ते करण्यासाठी पुण्यातील Dirt Blaster Cleaning Services पेक्षा चांगले अन्य मार्ग असू शकत नाही. ते जास्त चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यांनी केलेली सफाई अधिक सरस पण असते.

Our Most Popular Services in Pune & Pimpri Chinchwad

– Home Cleaning Services in Pune
– Sofa Cleaning Services in Pune
– Office Cleaning Services in Pune
– Bathroom Cleaning Services in Pune
– Kitchen Cleaning Services in Pune
– Carpet Cleaning Services in Pune
– Window Cleaning Services in Pune